||Jai Jagadamb Jai Durge|| ||Jai Jagadamb Jai Durge|| ||Jai Jagadamb Jai Durge||

Thursday, 8 January 2015

पूजन संक्रांतीच्या दिवशीचे - श्री मंगल चण्डीका प्रपत्ती


॥हरि ॐ॥
परमपूज्य सदगुरू श्री ( अनिरूद्ध ) बापूंचे गुरूवार दि. ०६ मे २०१० रोजी ‘रामराज्य’ ह्या विषयावर विशेष प्रवचन झाले. त्यावेळेस बोलताना बापू म्हणाले,
‘‘२०२५ मध्ये रामराज्य आणणे, हे माझे स्वप्न आहे, ध्येय आहे आणि ब्रीदही आहे. रामराज्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे, ते म्हणजे ‘श्रीचण्डिका उपासना’. रामराज्य आणण्यासाठी ही चण्डिका महत्त्वाची भूमिका निभावते. ह्यासाठीच आध्यात्मिक पातळीवर महत्त्वाचे अंग म्हणजे ‘श्रीचण्डिकाप्रपत्ती’. ‘प्रपत्ती’चा सरळ सरळ अर्थ आहे- आपत्तीनिवारण करणारी शरणागती.
ह्या चण्डिकेच्या कृपेनेच सर्वकाही होणार आहे. ‘विथ हर ग्रेस अँड हर ग्रेस ओन्ली, रामराज्य इज पॉसिबल.’ हिची उपासना केल्यामुळेच अशुभाचा नाश होतो, तसेच अशुभ दूर होते आणि यश व पराक्रम मिळत राहतात आणि अबाधित राहतात. दत्तगुरु आणि चण्डिकेने घालून दिलेल्या नियमानुसार , तिच्या पुत्रावरील पूर्ण विश्वास आणि तिच्याठायी असणारा पूर्ण शरणभाव असेल तरच हे होऊ शकते."
ह्या महिषासुरमर्दिनी चण्डिकेलाच आपण ‘दुर्गामाता’, ‘आदिमाता’ व श्रद्धावान विश्वात ‘मोठी आई‘ म्हणून साद घालतो.
बापू पुढे म्हणाले,
"श्रीचण्डिका प्रपत्ती ही गोष्ट प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाला पराक्रमी सैनिक, प्रापंचिक बनविणारी, पराक्रमी आध्यात्मिक बनविणारी आहे आणि सैनिक म्हणूनदेखील पराक्रमी बनवते".
श्रद्धावान पुरुषांसाठी ‘श्रीरणचण्डिकाप्रपत्ती’ तर श्रद्धावान स्त्रियांसाठी ‘श्रीमंगलचण्डिकाप्रपत्ती’. ‘श्रीरणचण्डिकाप्रपत्ती’ ही श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी केली जाऊ शकते. तर ‘श्रीमंगलचण्डिका प्रपत्ती’ ही संक्रांतीच्या दिवशी सूर्यास्तानंतर केली जाते.
बापू पुढे सांगतात,
"संक्रातीच्या दिवशी ही प्रपत्ती केल्यामुळे प्रत्येक स्त्री तिच्या कटुंबाची रक्षणकर्ती सैनिक बनते. तसेच, कुटुंबातील प्रत्येकाची बॉडीगार्ड बनते".
या वर्षी ‘श्रीमंगलचण्डिका प्रपत्ती’ ही १५  जानेवारीला आहे.

ही झाली ‘श्रीमंगलचण्डिका प्रपत्ती’ ची माहिती. पण बापू वारंवार आपल्याला सांगतात, देव भुलतो तो आपल्या भावाला. महत्वाचा ठरतो तो आपला देवावरील दृढ विश्वास आणि भक्ती.
ह्या संदर्भातील परमपूज्य नंदाईची भावना काय आहे, ते आपण पूज्य समीरसिंह यांच्या ब्लॉगवर (www.aniruddhafriend-samirsinh.com/prapatti) वर बघू शकतो.
बापू पुढे म्हणतात,
‘‘आध्यात्मिक आणि प्रापंचिक दोन्ही स्तरांवर यशस्वी सैनिक बनण्यासाठी ही ‘श्रीमंगलचण्डिका प्रपत्ती’ आहे. प्रपत्ती केल्याने स्त्रिया सक्षम आणि खंबीर रक्षणकर्त्या बनतील, तर पुरुषांचा पुरुषार्थ वाढेल, पराक्रम वाढेल, पुरुषबळ वाढेल.’’
‘श्रीमंगलचण्डिका प्रपत्ती’ हे स्त्रियांनी सांघिकरित्या करावयाचे व्रत आहे, जे श्रद्धावान स्त्रिया गेली २ वर्षे आनंदाने व जल्लोषात करत आहेत. हाच आनन्द व जल्लोष असाच कायम राहू दे, हीच आपण बापू व मोठ्याआईच्या चरणी प्रार्थना करूया.
श्रीराम - हरि ॐ - अंबज्ञ

No comments:

Post a Comment